सध्या सर्वत्र पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून प्रचाराचा अंतिम टप्पा आज संपत आहे.मात्र प्रचाराचा अंतिम टप्पा संपल्याने सोशल मीडियावर अमरावती पदवीधर मतदारसंघात एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आणि त्याने संपूर्ण राजकारणच तापवून टाकले.
ही ऑडिओ क्लिप म्हणजे उमेदवारी मिळण्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे व अपक्ष उमेदवार शरद झांबरे पाटील यांच्यातील असून हा संवाद झपाट्याने सोशल मीडियावर फिरत आहे.यामध्ये शरद झांबरे पाटील यांनी धीरज लिंगाडे यांना फोन करून विचारले की, तुम्हाला उमेदवारी मिळाल्यास तुम्ही लढणार अन्यथा लढणार नाही यावर उमेदवार धीरज लिंगाडे यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष बोगस आहे आणि काँग्रेस मधील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भाजपाला मॅनेज झाल्याचे त्यांनी बोलण्याचे ऑडिओ वरून लक्षात येत आहे.मात्र भाजप चे डॉ. रणजीत पाटील दोन टर्म पदवीधर मधून निवडून येउनही ते कधीच विद्यापीठातिल एकही मीटिंग ला उपस्थित राहिले नाही पदवीधराना कुठलाही रोजगार उपलब्ध करुन दिला नाही व व त्यांच्या समस्याची साधी दखलही घेतली नाही असा आरोप अपक्ष उमेदवाराने भाजप च्या उमेंदवारावर पत्रकार परिषदेत केला आहे.
त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार पदवीधराचा मतदानचा कौल कोणाच्या बाजूने असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्याचे दिसत आहे तथापि सद्यातरी सर्व उमेदवाराची प्रतिष्ठा पनाला लागल्याचे चित्र दिसत आहे सामना नक्कीच रंगतदार असला तरी कोणाची विकेट पडणार आणि कोण सामना जिंकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे तथापी ऑडिओ क्लिप नेमकी या दोन उमेदवारांचीच आहे की कोणी इतरांनी तयार करुन मतदारांमध्ये भ्रम निर्माण करणाऱ्या उद्देशाने रेकॉर्ड केला की काय याबद्दल खुद्द उमेदवारच सांगू शकतात तसेच काँग्रेस याबद्दल आपली काय भूमिका आहे.याचे स्पष्टीकरण देईल का याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागलेले आहे.
ब्यूरो चीफ :- सचिन झिटे यवतमाळ