भुसावळ बाजारपेठ पो.स्टे सीसीटीएनएस गुरन १९/२०२३ भादवि कलम ४५४, ४५७.३८० प्रमाणे दिनांक ०७/०१/२०२३ रोजी गुन्हा दाखल झालेला असुन सदर गुन्ह्यात फिर्यादी धनश्री प्रमोद भारंबे रा.तुकाराम नगर भुसावळ यांचे घरी दिनांक ०५/०१/२०२३ ते दिनांक ०७/०१/२०२३ दरम्यान कोणत्यातरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एकुण ५०,५००/- रूपये कि. चे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रूपये असे घरफोडी करून चोरी केली होती.
सदर गुन्हयाच्या तपासात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अमंलदार पोहेका/२६९२ विजय बळीराम नेरकर, पोना/ २८१६ निलेश बाबुलाल चौधरी, पोना/६३१ उमाकांत पन्नालाल पाटील, पोकॉ/ ३३९८ प्रशांत रमेश परदेशी व पोकॉ / २९३ योगेश नामदेव माळी अशांनी सदर गुन्हयातील आरोपीताचा शोध घेत असतांना त्यांनी तांत्रीक विश्लेषण करुन अज्ञात आरोपी निष्पन्न करुन सदर गुन्हयातील आरोपी पुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हददीत आल्याची गोपिनय माहीती पोना / ६३१ उमाकांत पन्नालाल पाटील, पोकॉ/ ३३९८ प्रशांत रमेश परदेशी, पोकॉ / २९३ योगेश नामदेव माळी यांना मिळाल्याने बाजारपेठ पोस्टेच्या गुन्हे शोध पथकाने यातील आरोपी नामे १) शेख ईरफान उर्फ हशरद शेख रउफ वय २४ रा. टिपु सुलतान चौक जामनेर.
२) फातेर शेख उर्फ गोल्या तुफेल मोहम्मद शेख वय १८ रा. ईस्लामपुरा जामनेर यांना भुसावळ शहरातुन व आरोपी क्रमांक ३) शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर वय २१ रा. मदिना नगर जामनेर अंशाना ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत तिन घरफोडी गुन्हे केल्याची कबुली दिली असुन सदर आरोपीतांच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेल हत्यार व वाहने तसेच मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहे. तसेच सदर आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असतांना त्यांच्या कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
त्याचे वर्णन खालील प्रमाणे –
१) भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. गुरन १९/२०२३ भादवि कलम ४५४.४५७,३८० मध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी ५ ग्रम वजनाची एक सोन्याची अंगठी व चांदीच्या पायातील पैंजण व २४२५/- रु. रोख
२) भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. गुरन २९/२०२३ भादवि कलम ४५४,४५७.३८० मध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी ५.५ ग्रम वजनाची सोन्याची पोत मधील पेन्डल व सोन्याचे मणी
३) भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. गुरन ३२ / २०२३ भादवि कलम ४५७,३८० सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे.
सदर वरील गुन्हे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड भुसावळ बाजारपेठ पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो.स्टे चे पोहेका २६९२ विजय नेरकर, पोना २८१६ निलेश चौधरी, पोना ६३१ उमाकांत पाटील, पोकॉ ३३९८ प्रशांत परदेशी, पोकॉ २९३ योगेश माळी, पोकॉ २०२८ सचिन चौधरी, पोकॉ १८३१ अतुल कुमावत, पोकॉ १५५० सागर वंजारी, पोकॉ ३४६ भरत बाविस्कर, पो.का./५९ जावेद शहा, पोना ३०३ तुषार पाटील, पोकॉ २३०८ सचिन पोळ अंशानी कारवाई केली आहे.