पोखरा (नेपाळ) येथे रंगशाला स्टेडीयमवर संपन्न झालेल्या भारत – नेपाळ आंतरराष्ट्रीय एथेलेटिक्स व क्रिकेट स्पर्धेत निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. त्यात नाशिकचा प्रेम चौधरी याने १०० मिटर्स मध्ये रौप्य पदक तर भुसावळचा निखिल लोखंडे याने क्रिकेट स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले.
तसेच या दोन्ही खेळाडूंची मलेशिया येथे होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी साठी निवड झाली आहे. त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल व निवड झाल्याबद्दल भारतीय क्रीडा विकास आणि पदोन्नती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश राणे व निलेश राणे युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गणेश कमानकर यांनी दोघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात !
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ