भुसावळ येथील नायब तहसीलदार यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर ताब्यात घेऊन जप्त केले.महसूल विभागाने बुधवार रात्री (दि.४) ही कारवाई केली.
जळगांव वरून भुसावळ कडे वाळूने भरलेले डंपर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून येत असल्याची गोपनीय माहिती नायब तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अंगत असटकर पथक प्रमुख यांना मिळल्यावरून बुधवार दि.४ रोजी रात्री १०.०५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील राजस्थान मार्बल जवळ अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी वेळी मिळालेल्या माहिती आधारे संशयित वाहन थांबवून चालकांकडे शासकीय परवान्याची मागणी केली. परवाना नसतांना वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याची खात्री झाल्यानंतर वाहन मालक नुकूल नारायण ढाके राहणार रिंग रोड जळगांव याने त्यांच्या ताब्यातील (एम.एच.०४ एफ.पी.३७०८) वाळूने भरलेले डंपर शासकीय परवाना नसतांना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आले.
महसूल विभागाचे नायब तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अंगट असटकर पथक प्रमुख यांच्यासह मंडळ अधिकारी एफ.एस. खान तलाठी साकेगाव, मिलिंद तायडे कन्हाळे बुद्रुक, तलाठी माधुरी सोनवणे, तलाठी कुऱ्हे पानांचे विशाखा मून, तलाठी किन्ही सुनीता वाघमारे, कोतवाल जितेश चौधरी यांच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी वेळी मिळून कारवाई केली. वाळूने भरलेले वाहन तहसील कार्यालयात जमा केले.