Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळात रंगला ‘ पाडवा पहाट ‘ कार्यक्रम ; स्वररसात चिंब न्हाऊन निघाले रसिक-श्रोते…

भुसावळात रंगला ‘ पाडवा पहाट ‘ कार्यक्रम ; स्वररसात चिंब न्हाऊन निघाले रसिक-श्रोते…

दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष सर्वत्र नावीन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई, संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातचं न्यारी !
दोन वर्ष कोरोनामुळे ‘ पाडवा पहाट ’ कार्यक्रमाला खंड पडल्यानंतर आता निर्विघ्नपणे पाडवा पहाट कार्यक्रमाचे भुसावळ शहरातील एन. के. नारखेडे शाळेसमोरील सांस्कृतिक मैदान, सहकारनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
आज रसिक श्रोतेही पाडवा पहाट कार्यक्रमाला हजर असणे हे मानाचे समजतात. पहाटे लवकर उठून स्नान करून अस्सल पारंपारिक मराठी पेहराव परिधान करून रसिक मंडळींची या “पाडवा पहाट” कार्यक्रमाला हजेरी होती, या सगळ्यामुळे एकूणच वातावरणात एक औरच चैतन्य भरलं गेलं. कलाकार मंडळींनीही तितक्याच उत्साहाने कार्यक्रम सादर केला. संपूर्णपणे मराठी ‘फील’ देणारी, भारावलेली अशी ही पहाट भुसावळकारांच्या आयुष्यात अविस्मरणीय राहील !


श्रोत्यांसाठी ही दिवाळी पहाट उत्साहाची असते, आनंदाची असते, तशीच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठीही उत्साहाची आणि त्याहीपेक्षा कसोटीची असते.
रोटरी क्लब भुसावळ रेलसिटी, रिदम हॉस्पिटल, ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आणि सुनहरे पलतर्फे या देखण्या ” पाडवा पहाट ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रसिक श्रोते स्वर रसात न्हाऊन निघाले. विविध गाजलेली भावगीते, भक्तिगीते यावेळी सादर झालीत.
सुपरिचित गायिका लक्ष्मी नाटेकर, विकास जंजाळे, संजय सुरवाडे, खाकी वर्दीतील कलावंत संदीप बडगे, जेष्ठ गायक गोपाळ गोस्वामी यांनी गायलेल्या गाण्यांमुळे ही दिवाळी अधिकच चैतन्यमय होऊन गेली आणि चांगलाच रंग भरला गेला. आणि प्रेक्षकांची वाहवा मिळविली !
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ रेलसिटीचे प्रोजेक्ट चेअरमन संदीप जोशी, को-चेअरमन जीवन चौधरी, अध्यक्ष डॉ. मकरंद चांदवडकर, सचिव सन्मित पोतदार, डॉ.शंतनू साहू, नगरसेवक प्रमोद नेमाडे यांनी श्री गणेशाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून पूजन केले.
कलावंत दीपक नाटेकर, सुप्रसिद्ध निवेदक व कलाकार तुषार वाघुळदे, गायिका लक्ष्मी नाटेकर, विकास जंजाळे, संजय सुरवाडे, परवेज शेख, गोपाळ गोस्वामी, विवेक शिवरामे, फिरोज पठाण, संजय पटेल, मुन्ना साऊंडचे मंसूर भाई, अविनाश ठाकूर आदींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या देखण्या आणि अनोख्या कार्यक्रमाला भुसावळकर रसिकांनी चांगलीच दाद दिली. उपस्थितांमध्ये मनोज सोनार, सामाजिक कार्यकर्ते सोनू मांडे, सुनील पाटील, संदीप सुरवाडे, अंजली जोशी, अनघा कुळकर्णी, नेहा वाघुळदे आदींची हजेरी होती.

रिपोर्टर – आकाश ढाके, भुसावळ

Follow us :

Check Also

कथित Dog Lovers ने जयेश देसाई को बदनाम करने में कोई कसर नहीं छोड़ी

आजकल एनिमल लवर्स का ऐसा ट्रेंड चल गया है कि जरा कुछ हो जाये लोग …

Leave a Reply

error

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)

RSS
Follow by Email
YouTube
YouTube
Pinterest
Pinterest
fb-share-icon
LinkedIn
LinkedIn
Share
Instagram
Telegram
WhatsApp