
मुंबईतील खार येथील बांधकाम व्यावसायिकाच्या घरी नोकराने 50 लाखाच्या वर चोरी करून पळून जात असताना त्याला भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपीएफच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्याची रवानगी खार पोलीस ठाण्यात केली आहे.
मुंबईतील खार येथील बांधकाम व्यवसायिक मुकेश गांधी यांच्याकडे संशयित आरोपी राहुल रचत कामत वय वर्ष 25 राहणार मर्णेया उमरकट जिल्हा मधुबनी बिहार हा तीन वर्षापासून कामाला होता. 19 आँगस्ट रोजी घरात कोणी नसल्याची संधी साधून राहुल कामत याने सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम विदेशी चलन असा एकूण 50 लाख 74 हजार 576 रुपयाचा मुद्देमाल लांबविला याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांनी संशयित आरोपी राहुल रचत कामत याच्याविरुद्ध खारघर पोलिसात तक्रार दाखल केली सदर आरोपी हा सुरत येथून तो अंत्योदय एक्सप्रेसने बिहार मधील आपल्या गावाकडे पळून जात असताना भुसावळ येथील रेल्वे स्थानकावर आरपीएफ निरीक्षक आर के मीना व जीआरपी चे निरीक्षक विजय घेरडे यांनी त्यांच्या पथकासह कारवाई करीत आरोपीला अंत्योदय एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून ताब्यात घेतले त्याच्याकडून 42 लाख 72 हजार किमतीचे सोने एक लाख पाच हजार किमतीची चांदी व एक लाख बत्तीस हजार किमतीचे विदेशी चलन तसेच तीन लाख 82 हजार रुपयांचे भारतीय चलन तसेच 12 विदेशी घड्याळे अंदाजे 1 लाख 20 हजार रुपये चा मुद्दे माल असा एकुण 5 लाख 74 हजार 576 रुपये किमंती चा मुद्दे माल हस्तगत केला आहे.
.
.कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर के मीना उपनिरीक्षक एके तिवारी सहाय्यक फौजदार प्रेम चौधरी प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलीस निरीक्षक विजय घेरडे अजित तडवी दिवाण सिंग राजपूत धनराज लुल्ले यांच्या पथकाने केली आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ