
गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे कोणतेही सण उत्सव साजरे करता आले नाही. यंदा मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याने गणेश भक्तांनी विविध प्रकारचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज जळगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या शांतता समितीच्या बैठकीमध्ये सर्व हिंदू मुस्लिम व इतर समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शासनाचे सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा केला जाईल यामध्ये लाऊड स्पीकर , श्री चे आगमन, विसर्जन यावर विशेष चर्चा करण्यात आली. सर्व गणेश भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच सामाजिक एकोपा व देशभक्ती विषयी, देखावे सादर करावे. असे डॉ. प्रविण मुंढे यांनी सांगितले आहे.
कोणतीही अप्रिय घटने विना श्री गणेशोत्सव पार पडेल असा विश्वास देखील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीत सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ