Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावल विभागात ‘फोर्ट्रेस’ विशेष तिकीट तपासणी अभियान; ७८२ प्रकरणांवर कारवाई

भुसावल विभागात ‘फोर्ट्रेस’ विशेष तिकीट तपासणी अभियान; ७८२ प्रकरणांवर कारवाई

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake| Khabar 24 Express


प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने भुसावल रेल्वे विभागाकडून विनातिकीट व अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी “फोर्ट्रेस तिकीट तपासणी अभियान” पार पडले.


या विशेष मोहिमेत भुसावल, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या ८ प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा आणि नियमांचे पालन करावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.


अभियानात ५८ तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे १० जवान सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान ७८२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात येऊन तब्बल ₹५,८६,०४० इतका दंड वसूल करण्यात आला.


तसेच रेल्वे कायद्याच्या कलम १४५बी व १६७ अंतर्गत ७ प्रकरणे नोंदवून ₹१,७०० दंड वसूल करण्यात आला. स्थानक परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या ४ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.


भुसावल विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी वैध तिकीट घेऊनच जबाबदारीने प्रवास करावा, जेणेकरून दंड व गैरसोय टाळता येईल.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading