Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भीम जयंतीत गोंधळ; अतिक्रमण वादातून महिलेला मारहाण, कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या

भीम जयंतीत गोंधळ; अतिक्रमण वादातून महिलेला मारहाण, कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या

Bhim Jayanti Nagpur Clash | Encroachment Dispute Leads to Assault and Death Threats | Nagpur News | Khabar 24 Express





नागपूरमध्ये भीम जयंतीच्या उत्सवाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिक्रमणाच्या जुन्या वादातून माटे चौक परिसरात मोठा गोंधळ उडाला असून महिलेला मारहाण, शिवीगाळ तसेच संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीम जयंतीनिमित्त रात्री सुमारे ११:३० वाजताच्या सुमारास माटे चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रोशनी भैसारे मेहरे, गिरीश वाल्दे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या नृत्य कार्यक्रमात सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते.

याच दरम्यान सीमा दहिकार बागडे, रंजना शेंडे आणि आरती धारगावे यांनी जाणूनबुजून धक्काबुक्की करत वाद निर्माण केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला रोशनी मेहरे आणि त्यांच्या भावाने हा प्रकार दुर्लक्षित करून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित महिलांनी आपल्या गटासह पुन्हा त्या ठिकाणी येऊन वाद सुरूच ठेवला.

परिस्थिती शांत करण्यासाठी रोशनी मेहरे तेथून निघण्याचा प्रयत्न करत असताना रंजना शेंडे हिने त्यांचा हात पकडून मुरगळल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर रोशनी मेहरे आणि त्यांचे कुटुंबीय गोपाल नगर येथील घरी परतले.

मात्र, वाद इथेच थांबला नाही. आरोप आहे की रंजना शेंडे, सीमा दहिकार, युवराज शेंडे आणि आरती धारगावे यांनी त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. तसेच युवराज शेंडे यांनी “पेट्रोल टाकून जाळून टाकीन, तसेच वस्तीतल्या मुलांना बोलावून संपवून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गिरीश वाल्दे यांचा जुना मालमत्ता वाद असून संबंधितांनी त्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. या वादातूनच पूर्वनियोजित कट रचून उलट त्यांच्यावर महिलेला मारहाण केल्याचे खोटे आरोप लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राणा प्रताप नगर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे. संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.



Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

NEET Paper Leak: बढ़ते दबाव के बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, मोदी सरकार का बड़ा फैसला

NEET Paper Leak: बढ़ते दबाव के बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, मोदी सरकार का बड़ा फैसला

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe