भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कला मंडळातर्फे आज विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा आणि विविध कलाविष्कारांचे प्रस्तुतीकरण सादर केले. विद्यार्थ्यांनी रांगोळी, चित्रकला, व्यंगचित्र, इन्स्टॉलेशन, क्ले मॉडेल, मेहंदी, स्पॉट पेंटींग,फोटोग्राफी व पारंपारिक वेशभूषा यात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना कला अविष्काराद्वारे प्रस्तुत केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी. एच ब-हाटे, डॉ. ए.डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन. भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढवुन त्यांचे कौतुक केले. विविध स्पर्धांचे परिक्षकांनी परिक्षण करून त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक देण्यात आले.
या वेळी महाविदयालयातील प्राध्यापक, प्राध्यापिक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विधार्थीनी उपस्थित होते. नाहाटा महाविद्यालयात उद्या शनिवार रोजी सकाळी १०:३० पासून महाविद्यालयाच्या प्रांगणात नृत्यस्वरांजली कार्यक्रम होणार असून कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मोहनभाऊ फालक असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन मा. श्री. महेश भाऊ फालक, सचिव मा.श्री. विष्णू भाऊ चौधरी, खजिनदार मा. श्री. संजय कुमार नाहाटा आदी उपस्थित असतील. बाजारपेठ पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. श्री. राहुल गायकवाड यांच्या हस्ते ‘ स्वंराजली ‘ कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात येईल.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
खबर 24 एक्सप्रेस के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करने के लिए यहां क्लिक करें
https://youtube.com/@khabar24express