शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ५२ कार्यकर्त्यांनी अमरदीप टॉकीज चौकातील छोटेखानी कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला तसेच यावेळी जाम मोहल्ला, कलाली वाडा येथे पक्षाच्या 2 शाखेचे जल्लोषात उद्घाटन झाले.
भुसावळ शहरासह तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात इनकमिंग वाढले असून,आगामी निवडणुकांत या पक्षाला चांगले भवितव्य असल्याने भाजपसह व इतर पक्षाचे ५२ कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, पक्ष प्रवेश सोहळ्यास संपर्कप्रमुख विलास पारकर, सहसंपर्क प्रमुख मनोहर पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, सहसमन्वयक उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक संजय ब्राम्हणे व सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, रेलकामगार सेना, अल्पसंख्याक आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, शिक्षक सेना व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी अशांची उपस्थिती होती.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ