भुसावळ शहरातील गडकरी नगर मधील प्रेरणा नवदुर्गा मंडळातर्फे आजादी का अमृत महोत्सव व 2 आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दुर शास्त्री जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर व प्रेरणा नगर चौकाचे नामांतर आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सामाजिक कार्यकर्ते सारंग पाटील, डॉ. सुनीता महाजन, माजी नगरसेवक मंगेश गुंजाळ, मनिष पाटील आदी जण उपस्थित होते.
प्रेरणा नवदुर्गा मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते रक्तदान केल्याने पुण्य मिळते. कोणाला कधी रक्ताची गरज पडणार हे सांगता येत नाही, त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, असे आमदार संजय सावकारे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे कार्यकर्ते विरेंद्र चपारिया, सुनील पाटील, युवराज पाटील आदींनी परिश्रम घेतले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ