जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या सिंधी कॉलनी मध्ये पोलिसांनी धाड टाकून अंदाजे सात लाख रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे शहरांमध्ये गुटख्याची तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अंदाजे ६ ते ७ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा मालाचे दुकान व गोडाऊन पोलिसांनी सील केले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी दीपक चेतवानी व रमेश चेतवानी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शहरामध्ये अजून कोणी चोरुन लपुन गुटखा विक्री करीत आहे का ? या संशयित आरोपींचे अजुन कोणाशी गुटखा विक्री बाबत व्यवहार आहेत का याचा पोलीस कसुन तपास करीत आहेत.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव