Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान; ६०१ प्रवाशांवर कारवाई

भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान; ६०१ प्रवाशांवर कारवाई

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी भुसावळ रेल्वे विभागाकडून विनातिकीट व अनधिकृत प्रवासाविरोधात विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.


दि. ८ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या “फोर्ट्रेस तिकीट तपासणी अभियान” अंतर्गत भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा व अमरावती या ८ प्रमुख स्थानकांवर एकाच वेळी तपासणी करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश प्रवाशांना वैध तिकीटासह प्रवास करण्यास प्रवृत्त करणे व अनधिकृत प्रवासावर आळा घालणे हा होता.


या अभियानात ६० तिकीट तपासणी कर्मचारी तसेच ९ रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान ६०१ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून ₹४,३०,३३० इतका दंड वसूल करण्यात आला.


याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम १४५(ब) व १६७ अंतर्गत १७ प्रकरणे नोंदवून ₹२,५०० दंड वसूल करण्यात आला. तसेच स्थानक परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या १२ विक्रेत्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली.


दरम्यान, भुसावळ विभागाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe