Breaking News
BigRoz Big Roz
Home / Crime / भुसावळ शहरात गावठी बनावटीचे २ पिस्टलसह ५ जिवंत काडतुसे जप्त ; २ जणांना अटक

भुसावळ शहरात गावठी बनावटीचे २ पिस्टलसह ५ जिवंत काडतुसे जप्त ; २ जणांना अटक

भुसावळ शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलाणी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर २ इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.

गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून मिळालेल्या माहिती संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथक घटनास्थळी पोहचून सापळा रचून २ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून २ बनाबट गावठी पिस्टलसह ५ जिवंत काडतुसे बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले आहे. फिर्यादी पोकॉ प्रशांत निळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 18/09/2022 रोजी 04:15 वाजेला भुसावळ शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलाणी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून बसले असता सै. सिकंदर बशरत अली (वय 42) रा. कवाडे नगर, भुसावळ. नरेश देविदास सुरवाडे (वय 29) रा. गोलाणी कॉम्प्लेक्स, हनुमान मंदिर जवळ, भुसावळ हे त्यांच्या कब्जात विना पास परवाना गावठी बनावटीचे २ पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगतांना मिळून आले तसेच १ हिरो कंपनीची काळ्या लाल रंगाची मोटरसायकल असे एकूण 50,500 रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून आरोपितांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 3 / 25 व म.पो. अधिनियम कलम (37) (3) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई स.पो.नि हरीश भोये, पो.हे.कॉ विजय नेरकर, पो.ना निलेश चौधरी, पो.ना. उमाकांत पाटील, शशिकांत तायडे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी, पो.ना. दिनेश कापडणे अशांनी मिळून केली.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

Follow us :

Check Also

सौसर मे ABVP परिषद ने मुख्यमंत्री शिवराज को छात्रों की समस्या से कराया अवगत

आज सौसर मे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारा मध्यप्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान का …

Leave a Reply

Your email address will not be published.

error

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)

RSS
Follow by Email
YouTube
YouTube
Pinterest
Pinterest
fb-share-icon
LinkedIn
LinkedIn
Share
Instagram
Telegram
WhatsApp