Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर हल्ला; मराठी पत्रकार संघाचा निषेध

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर हल्ला; मराठी पत्रकार संघाचा निषेध

भुसावळ प्रतिनिधी – नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा मराठी पत्रकार संघ भुसावळ तालुक्याने तीव्र निषेध केला आहे. संघाने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा समाजातील चौथा स्तंभ असून सत्य जनतेसमोर पोहोचवण्याचे कार्य करतो. अशा पत्रकारांवर गुंडगिरीने हल्ला करणे ही घटना लोकशाही व्यवस्थेवर आघात असून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे.

भुसावळ तालुका मराठी पत्रकार संघाने हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांवर ठोस दंडात्मक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

निवेदनावर स्वाक्षऱ्या:
संतोष शेलोडे (तालुका अध्यक्ष), मनोहर लोणे (सचिव), आकाश ढाके, विनोद गोरधे, किशोर सावळे, रवि कोलते, शोएब सय्यद, कलीम पायलट, वसीम शेख, कमलेश चौधरी, संजय काशिव, हबीब चव्हाण आदी.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

रायबरेली: पीएम आवास योजना 2.0 में 3439 लाभार्थियों को डीबीटी राशि, डीएम हर्षिता माथुर व विधायक अशोक कोरी ने किया सम्मान

रायबरेली: पीएम आवास योजना 2.0 में 3439 लाभार्थियों को डीबीटी राशि, डीएम हर्षिता माथुर व विधायक अशोक कोरी ने किया सम्मान

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading