Breaking News
BigRoz Big Roz
Home / खबरें / दहावी-बारावी निकालानंतर दाखल्यांचा खोळंबा; प्रशासनाविरोधात नाराजी

दहावी-बारावी निकालानंतर दाखल्यांचा खोळंबा; प्रशासनाविरोधात नाराजी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विविध दाखल्यांसाठी शहरातील महा-ई-सेवा केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून संबंधित वेबसाईट वारंवार बंद पडत असल्याने कामकाज ठप्प होत आहे.

उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांना दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून दाखले मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

भुसावळ शहर तलाठी कार्यालयात उत्पन्न दाखल्यावर सही करण्यासाठी तलाठी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी व पालकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, भुसावळमध्ये वाढत्या उन्हामुळे नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत. कडक उन्हात दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने पालक व विद्यार्थ्यांचा संताप व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दाखले विलंब न करता ताबडतोब उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading