Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या तिढ्याला अखेर पूर्णविराम मिळाला असून विद्यमान उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदग्रहणानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांना पद सोडावे लागले, त्यानंतर नगरपालिकेचा कारभार कोणाकडे सोपवायचा याबाबत प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू होती.
अखेर प्रशासनाने शैलजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. रखडलेली विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7