Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / पर्यावरण संवर्धन समितीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी पवन नाले यांची निवड

पर्यावरण संवर्धन समितीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी पवन नाले यांची निवड

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


जळगाव : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार), उत्तर महाराष्ट्र सचिव तथा भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी आणि जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे (अप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली पवन रविंद्र नाले यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


पवन नाले हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जैवविविधता जतन तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे भुसावळ तालुक्यात पर्यावरण संरक्षण व विकासाच्या विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


या निवडीबद्दल विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी तसेच पत्रकार बांधवांकडून पवन नाले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात वृक्षलागवड, पाणी संवर्धन, पर्यावरण जनजागृती आणि जैवविविधता संवर्धनासाठी व्यापक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading