Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / दोन महिन्यांपासून डिझेल करार रखडला; भुसावळ आगार प्रशासनावर प्रश्नचिन्ह

दोन महिन्यांपासून डिझेल करार रखडला; भुसावळ आगार प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Bhusawal Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : राज्यभरात पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली असताना भुसावळ बस आगारातही डिझेल पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून आगारातील डिझेल पुरवठ्याचा करार संपुष्टात आल्याने एसटी बस चालक-वाहकांना मार्गातील इतर आगारांमधून डिझेल भरावे लागत आहे.

भुसावळ आगारात डिझेल उपलब्ध नसल्याने विविध मार्गांवरील बसना प्रवासादरम्यान इतर आगारांवर थांबून इंधन भरावे लागत असल्याची माहिती वाहकांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर व पुणे मार्गावरील बसना जामनेर आगारातून, नागपूर-अकोला मार्गावरील बसना मुक्ताईनगर आगारातून, मुंबई-नाशिक मार्गावरील बसना जळगाव आगारातून तर धुळे-शिरपूर मार्गावरील बसना यावल आगारातून डिझेल भरावे लागत आहे.

या अतिरिक्त प्रक्रियेमुळे बस प्रवासाचा वेळ वाढत असून प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा प्रवासी आणि वाहक यांच्यात शाब्दिक चकमकी होत असल्याचेही समोर आले आहे. प्रवाशांच्या रोषाला वाहकांना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.

हे कटू प्रसंग टाळण्यासाठी आणि बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने संपलेल्या डिझेल कराराचे त्वरित नूतनीकरण करून भुसावळ आगारात नियमित इंधन पुरवठा सुरू करावा, अशी मागणी वाहकांकडून करण्यात येत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading