Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळात जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात; वृत्तपत्र छायाचित्रकारांकडून कॅमेरा पूजन

भुसावळात जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात; वृत्तपत्र छायाचित्रकारांकडून कॅमेरा पूजन

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake| Khabar 24 Express


जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त बुधवार, १९ ऑगस्ट रोजी भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या वतीने कॅमेरा पूजन करून जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेम परदेशी होते. प्रारंभी छायाचित्रकार श्याम गोविंदा, कमलेश चौधरी आणि विनोद गोरधे यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.


यावेळी पत्रकार उज्ज्वला बागुल यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक घडामोडींचे विश्लेषण करून त्या समाजासमोर मांडतो; तर छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्याच्या एका क्लिकद्वारे एखादा महत्त्वपूर्ण क्षण टिपून तो समाजासमोर सादर करतो.

एक क्षण अचूकपणे टिपण्यासाठी छायाचित्रकारांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा एका छायाचित्रामुळे संपूर्ण बातमीचे महत्त्व अधोरेखित होते.

याप्रसंगी पत्रकार सुनील आराक, प्रेम परदेशी, आकाश ढाके, मनोहर लोणे यांच्यासह छायाचित्रकार श्याम गोविंदा, कमलेश चौधरी, विनोद गोरधे, किशोर साळवे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील आराक यांनी केले, तर आभार संतोष शेलोडे यांनी मानले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

चेंबूर में महिला गटई कामगार से कथित मारपीट, राष्ट्रीय चर्मकार संघ ने जताया भारी विरोध

चेंबूर में महिला गटई कामगार से कथित मारपीट, राष्ट्रीय चर्मकार संघ ने जताया भारी विरोध

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading