Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भुसावळ शहरात प्रथमच महिलांसाठी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. महिलांनी आयोजित केलेल्या या यात्रेत शहरातील शेकडो महिला भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कावड वाहिली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कावड यात्रेत महिलांनी पारंपरिक पद्धतीने कावड घेऊन भगवान महादेवाच्या नामस्मरणात सहभाग घेतला. भक्ती आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम या यात्रेत पाहायला मिळाला.
भुसावळच्या इतिहासात प्रथमच झालेल्या या महिला कावड यात्रेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी नगराध्यक्षा सौ. शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे, नगरसेविका सौ. महिमा नागराणी, सौ. मानवी आहूजा, सौ. मीनाक्षी धाडे, जेसीआय भुसावळ ताप्तीच्या अध्यक्षा सौ. हेमा बेहरा, सचिव सौ. रेखा व्यास यांच्यासह सौ. अनिता आंबेकर, सौ. वर्षा जैन, सौ. पल्लवी झोपे, सौ. निकिता खुशलानी, सौ. रुचिता अग्रवाल, सौ. नंदिनी रायपुरे, सौ. अनुराधा ठाकूर, सौ. सुहाना आहूजा, सौ. सुहानी पोहानी, सौ. प्राची राजपाल, सौ. दीपा पटेल, सौ. संगीता शर्मा यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7