Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश! आरोपीच्या ताब्यातून तब्बल ४७ ग्रॅम ४८ मिली सोने जप्त

सोन्याच्या चोरीचा पर्दाफाश! आरोपीच्या ताब्यातून तब्बल ४७ ग्रॅम ४८ मिली सोने जप्त

Jalgaon Crime News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा ऐवज घेऊन पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याच्या ताब्यातून तब्बल ४७ ग्रॅम ४८ मिली सोन्याचा मुद्देमाल, अंदाजे किंमत ४ लाख ९५ हजार रुपये, हस्तगत केला आहे.

भुसावळ तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. १२९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) तसेच बोदवड पोलीस ठाणे गु.र.नं. १२८/२०२६, कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्यांतील आरोपी मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इराणी वस्ती, भुसावळ) याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता.

आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ अकोला येथे रवाना होऊन तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील ३२ ग्रॅम ४०० मिली वजनाची सोन्याची लगड, अंदाजे किंमत ३ लाख २० हजार रुपये, तर बोदवड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये, असा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हवालदार उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, संदीप चव्हाण, चापोका रिजवान शेख तसेच तांत्रिक मदतीसाठी पोलीस नाईक गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला.

अटक आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

‘हर घर तिरंगा’चा जयघोष! भुसावळात विद्यार्थ्यांची भव्य सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’चा जयघोष! भुसावळात विद्यार्थ्यांची भव्य सायकल रॅली

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading