Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / वर्दी फक्त पकडत नाही, जीवही वाचवते”; SDPO पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

वर्दी फक्त पकडत नाही, जीवही वाचवते”; SDPO पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

खामगाव न्यूज | ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस


खामगाव: एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन व अदाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. शासकीय रक्तपेढीत पार पडलेल्या या शिबिराची सुरुवात SDPO प्रदीपजी पाटील आणि रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांनी एकत्र रक्तदान करून केली.


खाकी वर्दीतून समाजसेवेचा आदर्श ठेवणारे प्रदीप पाटील हे नियमित रक्तदाते असून त्यांनी रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. तर सुरजभैय्या यादव यांनी आज तब्बल 56 वे रक्तदान करत समाजासाठी असलेली आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली.


रक्तदानानंतर प्रदीप पाटील म्हणाले, “वर्दीचा अर्थ फक्त पकडणं नाही, तर जीव वाचवणंही आहे. एका रक्तपिशवीमुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. एकनिष्ठा फाउंडेशनचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.”


सुरजभैय्या यादव यांनी 2008 ते 2026 या 18 वर्षांच्या काळात 56 वेळा रक्तदान करून तब्बल 19.6 लिटर रक्तदान केले आहे. त्यांच्या रक्तदानातून आतापर्यंत सुमारे 168 जणांना जीवनदान मिळाल्याची माहिती आयोजकांनी दिली.


या वेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार एकनिष्ठा फाउंडेशन व अदाणी फाउंडेशनतर्फे करण्यात आला. तसेच सुरजभैय्या यादव यांच्या 56 व्या रक्तदानाबद्दल SDPO प्रदीप पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.


शिबिरात एकनिष्ठाच्या 50 शिलेदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. या रक्तदानातून सुमारे 150 रुग्णांना जीवनाचा आधार मिळणार असल्याचे सांगण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पारीक यांनी केले. यावेळी अजय कडुकार, राजु घाटे, अजय निंबाळकर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, कैलास दणके, प्रवीण आखरे, विक्की सारवान, हर्षद कारिया, ईशाक मोहम्मद, तौफिक हस्मानी यांच्यासह सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढी अधिकारी, टेक्निशियन व कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी प्रदीप पाटील म्हणाले, “एकनिष्ठा फाउंडेशनला रक्तदान क्षेत्रात कधीच रक्ताची कमतरता भासू देणार नाही. कारण आमचं काम आहे – वाचवणं.”

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, खामगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading