Bhusawal Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ : येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर अखेर त्यांना पदावरून अपात्र ठरविण्यात आले असून, यासंदर्भातील शासकीय आदेश आज जारी करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून गायत्री भंगाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्जासोबत अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांकडून मिळालेले प्रमाणपत्र सादर केले होते. या निवडणुकीत त्यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई सावकारे यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
दरम्यान, शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार २३ एप्रिल रोजी संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले असून, भूतलक्षी प्रभावाने त्यांना नगराध्यक्षपदावरून अपात्र करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7