Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भाजपाचा भुसावळमध्ये जल्लोष; झालमुरी-पेढे वाटून विजयाचा आनंद

भाजपाचा भुसावळमध्ये जल्लोष; झालमुरी-पेढे वाटून विजयाचा आनंद

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल, आसाम व पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकांतील यशानिमित्त भुसावळ शहरात उत्साहात विजय जल्लोष साजरा करण्यात आला.


यावेळी कार्यकर्त्यांनी “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला.


कार्यक्रमाला राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे, भाजपा गटनेते युवराज लोणारी, रजनी सावकारे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर यांच्यासह नगरसेविका आशा कैलास पाटील, तसेच मनोज बियाणी, पिंटू कोठारी, सतीश सपकाळे, रुपेश देशमुख, विशाल जंगले, सुजित भोळे, श्रेयस इंगळे, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, जयंत माहुरकर, सागर चौधरी, गौरव आवटे, शंकर शेळके, राहुल तायडे, संतोष ठोकळ, रवी दाभाडे, विलास सातदिवे, नंदकिशोर बडगुजर, चेतन जैन, प्रशांत पाटील, रामशंकर दुबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


याशिवाय माजी तालुकाप्रमुख भालचंद्र पाटील, कुणाल येवले, नगरसेवक संजय नाहाटा, पराग भोळे, मनीष पाटील, योगेंद्र हरणे, वासू बोंडे, गोपी राजपूत आदी कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.


यावेळी झालमुरी व पेढ्यांचे वाटप करून सर्वांनी विजयाचा आनंद साजरा केला.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

Nagpur Fire News: Bhiwapur में भीषण आग के बाद एक्शन में Chandrashekhar Bawankule, पीड़ितों को तुरंत राहत और पुनर्वास का भरोसा

Nagpur Fire News: Bhiwapur में भीषण आग के बाद एक्शन में Chandrashekhar Bawankule, पीड़ितों को तुरंत राहत और पुनर्वास का भरोसा

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading