Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ अग्निशमन विभागावर पदाच्या दुरुपयोगाचा आरोप; केदार सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

भुसावळ अग्निशमन विभागावर पदाच्या दुरुपयोगाचा आरोप; केदार सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : शहरातील नगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आल्याचा दावा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची समक्ष भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केला.


माहितीनुसार, भुसावळ अग्निशमन विभागातील अधिकारी प्रशांत भोळे व कर्मचाऱ्यांनी दि. 29 एप्रिल 2025 रोजी क्रमांक 345 चे फायर सेफ्टी सर्टिफिकेट बियाणी फार्मसी कॉलेज, गट नं. 96/1, मिरगव्हाण शिवार, जामनेर रोड, भुसावळ येथील संस्थेला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच अशा प्रकारची अनेक फायर सेफ्टी प्रमाणपत्रे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


सदर कॉलेजमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत चुकीचे अथवा अनधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले असल्यास भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल केदार सानप यांनी उपस्थित केला आहे.


तक्रारीनुसार, फायर सेफ्टी सर्टिफिकेट देण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलेल्या मालेगाव फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस यांच्याकडे आहे. मात्र भुसावळ येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी असे प्रमाणपत्र देऊन अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


याशिवाय नगरपालिका हद्दीत तसेच हद्दीबाहेरही अनेक प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी अहवालाची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केदार सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading