Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / बनावट औषधांपासून देश वाचवा’ ; भुसावळात मेडिकल डीलर्सचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

बनावट औषधांपासून देश वाचवा’ ; भुसावळात मेडिकल डीलर्सचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : ऑल इंडिया स्तरावर पुकारण्यात आलेल्या मेडिकल बंदला प्रतिसाद देत भुसावळ तालुका मेडिकल डीलर्स असोसिएशनच्या वतीने आज भुसावळ येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी औषध विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.


मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मेडिकल व्यावसायिकांनी “ऑनलाइन औषधी विक्री बंद करा”, “कॉर्पोरेट्सद्वारे अत्यव्यावसायिक डिस्काउंट बंद करा” तसेच “बनावट औषधांपासून देश वाचवा” अशा प्रमुख मागण्या मांडल्या.


औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन औषध विक्रीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असून बनावट औषधांचा धोका वाढत आहे. तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवास्तव सवलतींमुळे लहान मेडिकल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.


मोर्चानंतर प्रतिनिधींनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र व राज्य शासनाने तातडीने याबाबत कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

धर्मांतर प्रकरणावर भाजप आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

धर्मांतर प्रकरणावर भाजप आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading