Breaking News
BigRoz Big Roz
Home / खबरें / कोणाच्या वरदहस्तामुळे सुरू झाडांची कत्तल?; भुसावळातील आदर्श हायस्कूल प्रकरणाने खळबळ

कोणाच्या वरदहस्तामुळे सुरू झाडांची कत्तल?; भुसावळातील आदर्श हायस्कूल प्रकरणाने खळबळ

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake| Khabar 24 Express


भुसावळ : शहरातील आदर्श हायस्कूल परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

विशेष म्हणजे शाळेतील कर्मचाऱ्यांसमक्षच झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याने या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या परिसरातील अनेक हिरवीगार झाडे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तोडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त करत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे तालुकाप्रमुख पवन नाले यांनी याबाबत नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेतली.

त्यांनी नगरपालिका अधिकारी धनराज बाविस्कर यांच्याशी चर्चा केली असता, “झाडे तोडण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही,” असे स्पष्ट करण्यात आले.

नगरपालिका प्रशासनाने परवानगी दिलेली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल कशी सुरू झाली? यामागे नेमके कोणाचा वरदहस्त आहे?

असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण असताना अशा प्रकारे बिनधास्त झाडतोड होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आता नगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

अवंतिका हॉस्पिटल के संस्थापक डॉ. बीपी सिंह के जन्मदिन पर विशेष: कम उम्र में बनाई अलग पहचान, बुलंदशहर में स्वास्थ्य सेवा और समाजसेवा का मजबूत नाम

अवंतिका हॉस्पिटल के संस्थापक डॉ. बीपी सिंह के जन्मदिन पर विशेष: कम उम्र में बनाई अलग पहचान, बुलंदशहर में स्वास्थ्य सेवा और समाजसेवा का मजबूत नाम

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading