Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / आरपीएफकडून “ऑपरेशन अमानत” अंतर्गत प्रवाशाचे हरवलेले सामान सुरक्षित परत

आरपीएफकडून “ऑपरेशन अमानत” अंतर्गत प्रवाशाचे हरवलेले सामान सुरक्षित परत

Akola News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


अकोला : रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी “ऑपरेशन अमानत” अंतर्गत पुन्हा एकदा तत्परता आणि प्रामाणिकपणाचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत प्रवाशाचे हरवलेले सामान सुरक्षितपणे परत केले. या कार्यवाहीमुळे प्रवाशांमध्ये आरपीएफबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.

दिनांक 22 मे 2026 रोजी आरपीएफ पोस्ट शेगाव येथून प्रधान आरक्षक जितेंद्र देशमुख यांनी माहिती दिली की, गाडी क्रमांक 12111 मुंबई–अमरावती एक्सप्रेसच्या A-1 डब्यातील सीट क्रमांक 30 वर एका प्रवाशाच्या दोन बॅग राहून गेल्या आहेत. या माहितीच्या आधारे अकोला रेल्वे स्थानकावर संबंधित गाडीची तपासणी करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली.

माहिती मिळताच सहाय्यक उपनिरीक्षक अशोक चांदूरकर आणि आरक्षक विनोद जटाळे यांनी अकोला रेल्वे स्थानकावर गाडी आगमनानंतर A-1 डब्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान सीटजवळ दोन बॅग सुरक्षित अवस्थेत आढळून आल्या.

पहिल्या बॅगेत डेल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, पर्स, एटीएम कार्ड आणि आधार कार्ड मिळून आले, तर दुसऱ्या बॅगेत नवीन कपडे आढळले. दोन्ही बॅगांसह एकूण सामानाची किंमत अंदाजे 58 हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले.

आरपीएफ पथकाने दोन्ही बॅग सुरक्षितपणे उतरवून आरपीएफ पोस्ट अकोला येथे आणल्या. तेथे सीसीटीव्ही देखरेखीखाली दोन पंचांच्या उपस्थितीत तपासणी करून सामान सुरक्षित ठेवण्यात आले. त्यानंतर संबंधित प्रवाशाला तात्काळ संपर्क साधून माहिती देण्यात आली.

यानंतर प्रवासी श्री. गिरीश पुरुषोत्तम पाटील (वय 50) हे आरपीएफ ठाणे अकोला येथे उपस्थित झाले. सहाय्यक उपनिरीक्षक अशोक चांदूरकर यांनी चौकशी व ओळख पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित सामान त्यांचेच असल्याची खात्री झाली.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दोन पंचांच्या उपस्थितीत संपूर्ण सामान सुरक्षित अवस्थेत प्रवाशाच्या ताब्यात देण्यात आले.

आपले मौल्यवान सामान सुरक्षितपणे परत मिळाल्याने प्रवाशाने आरपीएफच्या तत्परता, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

आरपीएफतर्फे राबविण्यात येणाऱ्या “ऑपरेशन अमानत” मोहिमेअंतर्गत प्रवाशांचे हरवलेले अथवा राहून गेलेले सामान सुरक्षितपणे परत करण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, त्यामुळे प्रवाशांमध्ये सुरक्षा आणि विश्वासाची भावना अधिक दृढ होत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, अकोला


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading