Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / धर्मांतर प्रकरणावर भाजप आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

धर्मांतर प्रकरणावर भाजप आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ शहरात उघडकीस आलेल्या कथित जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

भुसावळ नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, उत्तर विभाग शहराध्यक्ष संदीप सुरवाडे तसेच दक्षिण विभाग शहराध्यक्ष किरण कोलते यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

सदर प्रकरण “लव्ह जिहाद”शी संबंधित असल्याचा आरोप करत प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला कडक शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याशिवाय आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही सहआरोपी करण्यात यावे व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी नायब तहसीलदार विनंते यांनी निवेदन स्वीकारले.

या प्रसंगी मनोज बियाणी, पुरुषोत्तम नारखेडे, महेंद्रसिंग ठाकूर, राजेंद्र आवटे, ॲड. बोधराज चौधरी, मुकेश पाटील, अजय नागराणी, सुजित भोळे, विशाल नाटकर, सतीश सपकाळे, रुपेश देशमुख, प्राची पाटील, श्रेयस इंगळे, कैलास पाटील, अल्बर्ट तायडे, उदय पाटील, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, जयंत माहूरकर, सागर चौधरी, शैलेजा पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष अनिता आंबेकर, भारती वैष्णव, माधुरी चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकल्प वाणी, कैलास शेलोडे, प्रा. प्रशांत पाटील, प्रशांत नेवे, गोपीसिंग राजपूत, गौरव लोणारी, पवन शिंदे, चेतन सावकारे, सुजित वानखेडे, प्रवीण कुटे, उमेश चौधरी, सागर साळी, जयप्रकाश शुक्ला, संजय विश्वकर्मा, धनराज वारके, आकाश राजपूत, विवेक इंगळे, खिलेश महाजन, तेजस झांबरे, आकाश वारके, हर्षल चौधरी, सचिन बऱ्हाटे, गणेश महाजन, रोहन वारुळकर, नकुल महाजन तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading