Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / अवकाळी पावसामुळे रावेर लोकसभा क्षेत्रात मोठे नुकसान; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रत्यक्ष पाहणी

अवकाळी पावसामुळे रावेर लोकसभा क्षेत्रात मोठे नुकसान; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रत्यक्ष पाहणी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


जळगाव जिल्ह्यासह रावेर लोकसभा क्षेत्रात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर रक्षाताई खडसे यांनी अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली.


या भेटीदरम्यान त्यांनी भाजपा पदाधिकारी तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकसानीचा आढावा घेतला आणि पंचनाम्यांची माहिती जाणून घेतली. अवकाळी पाऊस, जोरदार वादळ आणि गारपीटमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देत रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.


यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, मुक्ताईनगर


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

नागपुर में RSS मुख्यालय के पास विस्फोटक बरामद, पूरे इलाके में हड़कंप, पुलिस जांच तेज

नागपुर में RSS मुख्यालय के पास विस्फोटक बरामद, पूरे इलाके में हड़कंप, पुलिस जांच तेज

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading