Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ विभागात RPFचे व्यापक जनजागृती अभियान; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

भुसावळ विभागात RPFचे व्यापक जनजागृती अभियान; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

Maharashtra News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : प्रवाशांची सुरक्षा व रेल्वे परिसरातील सतर्कता वाढविण्याच्या उद्देशाने भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दल (RPF) तर्फे दिनांक १ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले.


या अभियानादरम्यान रेल्वे ट्रॅक लगत राहणाऱ्या नागरिकांना ट्रॅकवर बाह्य वस्तू ठेवणे, रेल्वे साहित्याची चोरी करणे तसेच रील बनविण्यासारख्या धोकादायक कृत्यांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.


अभियानांतर्गत विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. ट्रेन जात असताना ट्रॅकजवळ उभे राहणे किंवा निष्काळजीपणे ट्रॅक ओलांडणे टाळावे, असे नागरिकांना सांगण्यात आले.

प्रवाशांना अनोळखी व्यक्तीकडून खाणे-पिणे स्वीकारू नये, नशायुक्त पदार्थांच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांपासून सावध राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.


याशिवाय रेल्वे ट्रॅकवर जनावरे आल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पशुपालकांना सूचना देण्यात आल्या. अवैध चेन पुलिंगमुळे रेल्वे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो व प्रवाशांना गैरसोय होते, याची जाणीव करून देत अशा प्रकारांवर दंडात्मक कारवाई केली जाते, असेही स्पष्ट करण्यात आले.


रेल्वेमध्ये ज्वलनशील व स्फोटक पदार्थ घेऊन प्रवास करणे धोकादायक असल्याने त्यावर कडक बंदी असल्याची माहिती देण्यात आली. तसेच प्रवाशांच्या सामान चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. अनधिकृतरीत्या रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचे धोकेही नागरिकांना समजावून सांगण्यात आले.


या अभियानादरम्यान रेल्वे स्थानके, प्लॅटफॉर्म आणि गाड्यांमध्ये उद्घोषणा, प्रत्यक्ष संवाद व डिजिटल माध्यमांद्वारे प्रवाशांना जागरूक करण्यात आले.


भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, भविष्यातही अशा प्रकारचे जनजागृती अभियान सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading