Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळमध्ये आक्रोश मोर्चा; विकासकामांवरील अडथळ्यांविरोधात नागरिकांचा संताप

भुसावळमध्ये आक्रोश मोर्चा; विकासकामांवरील अडथळ्यांविरोधात नागरिकांचा संताप

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ शहरातील विविध विकासकामांना विरोध होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शिवसेना ठाकरे गट तसेच अपंग बांधवांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यानंतर प्रांत अधिकारी, भुसावळ यांना निवेदन सादर करण्यात आले.


या मोर्चात जगन भाऊ सोनवणे, दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे, शहराध्यक्ष अजय दामू पाटील, जयंत लोणारी यांच्यासह अपंग बांधव, भगिनी व तृतीयपंथीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


निवेदनात नमूद करण्यात आले की, भुसावळ नगर परिषदेत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहिताच्या विकासकामांना विरोधी पक्षातील भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी विनाकारण विरोध करत असून त्यामुळे अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. स्मशानभूमीसाठी लाकूड उपलब्ध करून देणे, गरीबांच्या अंत्यसंस्कारासाठी शवपेट्या देणे, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी फवारणी, पाणीपुरवठा सुधारणा, क्लोरीनेटर बसविणे, विहिरींची दुरुस्ती, स्वच्छता अभियान, दिव्यांग निधी वाटप, घरकुल मंजुरी तसेच अल्पसंख्यांकांसाठी सभागृह उभारणी यांसारखी कामे रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे.


तसेच, शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक शौचालय उभारणी, बोअरिंगद्वारे पाणीपुरवठा, वाहतूक सिग्नल दुरुस्ती, शाळा व महाविद्यालयांसमोर स्पीड ब्रेकर बसविणे, गोशाळेसाठी जागा उपलब्ध करून देणे यांसारख्या मूलभूत सुविधांवरही परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यात अडथळे निर्माण होत असून जनतेच्या प्रश्नांवर राजकारण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे यांच्या कामकाजातही अडथळे आणले जात असल्याचे नमूद करण्यात आले.


दरम्यान, रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावावीत व अडथळा आणणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुढील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading