Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळात धडाकेबाज कारवाई : चोरीच्या ३ दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात

भुसावळात धडाकेबाज कारवाई : चोरीच्या ३ दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दुचाकी चोरी प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. चोरीच्या तीन दुचाकी जप्त करून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


जळगाव जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रावेर परिसरात काही संशयास्पद दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन दुचाकी जप्त केल्या.


जप्त दुचाकींचा तपशील (एकूण किंमत सुमारे ₹2,10,000):
पल्सर 125 (MH-19-ES-3555) – ₹50,000
बजाज पल्सर N-160 (MH-19-ET-3380) – ₹60,000
KTM Duke 250 (MH-16-DT-7433) – ₹1,00,000
तपासात उघडकीस आले की या दुचाकी मुक्ताईनगर, चोपडा शहर आणि अहमदनगर (तोफखाना) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या होत्या.


पोलिसांची संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत बाराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने यात सहभाग घेतला.
पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनमार्फत सुरू असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

NCERT च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

NCERT च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading