राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते भुसावळ रेल्वे विभागाच्या हॉस्पिटल ऑन व्हील आणि भुसावळ रेल्वे ग्राउंडवरील नवीन सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक निर्माण केल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडतील तसेच हॉस्पिटल ऑन व्हील हे रेल्वेच्या डब्यात उभे केलेले रुग्णालय ही अभिनव संकल्पना असून यामुळे सर्व सामान्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल असा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. राज्यपाल दुपारी ३ वाजेपर्यंत भुसावळातचं होते.
रेल्वेच्या ग्राउंडवर डीआरएम इति पांडे यांनी मशाल पेटवून ती विद्यार्थीनींकडे दिली. विद्यार्थिनींनी ही मशाल संपूर्ण मैदानावर फिरवली. यानंतर राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्तंभ मशाल प्रज्वलित करण्यात आली. नव्याने लोकार्पण केलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली. यात ताप्ती पब्लिक स्कूल, रेल्वे स्कूल, पोदार स्कूल, बोदवड येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ