Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ शहरात ४५ डिग्री कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांसमोरील धोका वाढत असताना, २८ एप्रिल रोजी एकाच दिवशी चार गोमाता व गोवंश दगावल्याची धक्कादायक घटना घडली. या पार्श्वभूमीवर गोसेवक रोहित महाले यांनी अत्यंत वेदनादायी परिस्थितीत मृत गोमातांच्या अंत्यसंस्कारासाठी धडपड केल्याचे समोर आले आहे.
नेहमीप्रमाणे नगरपरिषदेकडून जेसीबी मशीनची मदत मिळत असताना, यावेळी मात्र वेळेवर सेवा उपलब्ध न झाल्याने महाले यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रणरणत्या उन्हात मृत गोमातांचे हाल होत असल्याचे पाहून ते भावनिक झाले. “जगाची आई देवाघरी गेली, तिसरा दिवस निघाला, पण अंत्यसंस्कारासाठी साधन नाही,” अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली.
परिस्थिती गंभीर होत चालल्याने महाले यांनी इशारा दिला की, “जर गोसेवेसाठी आवश्यक जेसीबी व वाहने उपलब्ध झाली नाहीत, तर अन्न-पाणी त्यागून आमरण उपोषणाला बसणार.” दरम्यान, पेट्रोलसाठी गेले असता त्यांची नगरसेवक राज चौधरी यांच्याशी भेट झाली. महाले यांनी त्यांना संपूर्ण घटना सांगितल्यानंतर चौधरी यांनी तातडीने नगरपरिषदेला संपर्क साधून सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
महाले यांनी प्रशासनाला आवाहन करत सांगितले की, नगरपालिकेला मिळालेली नवीन वाहने ही अशा सेवांसाठीच वापरली जावीत. भविष्यात अशी अडचण निर्माण झाल्यास थेट मुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express