Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / विनातिकीट प्रवासाविरुद्ध भुसावळ विभागाची धडाकेबाज कारवाई ; एप्रिलमध्ये ₹12.23 कोटींचा विक्रम

विनातिकीट प्रवासाविरुद्ध भुसावळ विभागाची धडाकेबाज कारवाई ; एप्रिलमध्ये ₹12.23 कोटींचा विक्रम

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ विभागाच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल 2026 महिन्यात विनातिकीट व अनधिकृत प्रवासाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ₹12.23 कोटी दंड वसूल केला आहे. एकूण 1 लाख 9 हजार प्रवाशांवर कारवाई करत विभागाने महसुलाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.


मध्य रेल्वेकडून प्रवाशांना सुरक्षित, सुगम आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी विनातिकीट प्रवासावर कठोर नियंत्रण ठेवण्याचे धोरण अवलंबले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भुसावळ विभागात तिकीट तपासणी मोहिमा अधिक व्यापक आणि सघन करण्यात आल्या आहेत.


ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या दिशादर्शनात आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली.


मेल-एक्सप्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये नियमित तपासणी मोहिमा राबवल्यामुळे विनातिकीट प्रवासावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

कारवाईचा तपशील :

अनियमित प्रवास: 44,738 प्रकरणे — ₹2.18 कोटी दंड
विनातिकीट प्रवास: 63,608 प्रकरणे — ₹6.70 कोटी दंड
बुक न केलेले सामान: 404 प्रकरणे — ₹50 हजार दंड
याआधी मे 2025 मध्ये ₹11.20 कोटी महसूलाची नोंद झाली होती. मात्र, एप्रिल 2026 मध्ये हा विक्रम मोडीत काढत भुसावळ विभागाने इतिहासातील सर्वोच्च मासिक उत्पन्न नोंदवले आहे.


मध्य रेल्वेकडून प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले असून, विनातिकीट प्रवासाबाबत शून्य-सहिष्णुता धोरण कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe