
जामनेर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील दोन मोटरसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथील एका गुन्ह्यातील एक मोटरसायकल अशा एकूण तीन चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरिओम नगर, जामनेर) आणि दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या एका साथीदाराच्या मदतीने सदर मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान जामनेर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. १८/२०२६ व ३८/२०२६ (BNS 303(2)) अंतर्गत दोन मोटरसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथील गुन्हा रजि. नं. १७७/२०२४ (BNS 303(2)) अंतर्गत एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे तसेच पो. हे. कॉ. गोपाळ गव्हाडे, उमाकांत पाटील, पो. ना. विकास सातदिवे, पो. कॉ. प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7