Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / “नगरपालिकेच्या कामात अडथळा आणाल तर थेट गुन्हे दाखल करणार” नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचा इशारा

“नगरपालिकेच्या कामात अडथळा आणाल तर थेट गुन्हे दाखल करणार” नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचा इशारा

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ – गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी नेमके काय काम केले, असा सवाल उपस्थित करत लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्री चेतन भंगाळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, “तेव्हा सीओ साहेब दिसले नाहीत का?” असा थेट प्रश्न उपस्थित करत, आता नगरपालिकेच्या कामात अडथळे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


नगरपालिकेच्या कोणत्याही विकासकामात जाणीवपूर्वक अडथळा आणल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. माझ्यावर जे खोटे आरोप लावले जात आहेत, त्यांनाही मी सोडणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.


मी साध्या घरातून आलेली नगराध्यक्षा आहे, हे काही लोकांना खटकत आहे का? असा सवाल करत, माझ्या किंवा माझ्या कुटुंबाला कोणताही त्रास दिल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


भुसावळकर जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर तो मी सहन करणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी मी उभी आहे आणि उभीच राहणार, अशी ग्वाही दिली.


शहरातील गंभीर पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर सोडवणार, असा विश्वास व्यक्त करत नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी भुसावळच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading