Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / कोरोनामुळे अमृत योजना रखडली, विकासासाठी २८ नगरसेवक नगराध्यक्षांच्या सोबत – नगरसेवक पिंटू कोठारी

कोरोनामुळे अमृत योजना रखडली, विकासासाठी २८ नगरसेवक नगराध्यक्षांच्या सोबत – नगरसेवक पिंटू कोठारी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ – अमृत योजनेच्या कामास विलंब होण्यामागील मुख्य कारण कोरोनामुळे सलग दोन वर्षे काम पूर्णतः बंद राहिले, असे स्पष्टीकरण नगरसेवक पिंटू कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिले. कोरोनानंतर बांधकाम साहित्याचे दर तसेच इतर सर्व खर्च दुपटीने वाढल्याने कामाच्या मूळ अंदाजपत्रकात मोठा फरक पडला, असे त्यांनी सांगितले.


त्यावेळी अमृत योजनेचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले होते. त्यानंतर उर्वरित राहिलेल्या गल्ल्यांचे इंजिनिअरमार्फत डबल मोजमाप करून नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला. हा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आल्यामुळे कामास विलंब झाला, असे कोठारी यांनी स्पष्ट केले. दरवाढीमुळे कामाची एकूण किंमतही दुपटीने वाढली आहे, असे ते म्हणाले.


नगराध्यक्ष ताईंना ज्या-ज्या ठिकाणी २८ नगरसेवकांची आवश्यकता भासेल, त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू. शहराच्या हितासाठी आम्ही कधीही मागे हटणार नाही. आमचा विरोध सत्तेशी नाही, तर सुरू असलेले काम का थांबवण्यात आले यावर आहे असे कोठारी म्हणाले.


शहराच्या विकासासाठी सर्व २८ नगरसेवक नगराध्यक्षांच्या सोबत असून, केवळ एक फोन केल्यास आम्ही सह्या देण्यासाठी व कामासाठी तत्पर आहोत. चुकीच्या कामाला आमचा पाठिंबा राहणार नाही, मात्र विकासकामांना पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेली सर्व विकासकामे पूर्णत्वास नेण्यात येतील. कोणतेही काम थांबवले जाणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर मंत्री संजय सावकारे कधीही मागे हटणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असेही पिंटू कोठारी यांनी स्पष्ट केले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

प्रभाग 35 में नया चेहरा, बड़ा भरोसा: पहली बार मैदान में उतरे रमेश भंडारी, भाजपा का मजबूत दावेदार

प्रभाग 35 में नया चेहरा, बड़ा भरोसा: पहली बार मैदान में उतरे रमेश भंडारी, भाजपा का मजबूत दावेदार

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading