Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ नगरपरिषद निवडणूक : भाजपची शानदार सुरुवात; प्रिती मुकेश पाटील बिनविरोध विजयी

भुसावळ नगरपरिषद निवडणूक : भाजपची शानदार सुरुवात; प्रिती मुकेश पाटील बिनविरोध विजयी

आकाश ढाके, भुसावळ — जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार सुरुवात करत पहिला विजय आपल्या नावे केला आहे. प्रभाग क्रमांक 7 ‘अ’ मधील महिला राखीव गटातून भाजपच्या प्रिती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी होताच हा विजय निश्चित झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

प्रभाग 7 ‘अ’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे सारिका युवराज पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांच्या अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्ममध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी तो अर्ज बाद ठरविला. या निर्णयानंतर प्रिती पाटील यांच्या विरोधात कोणताही उमेदवार शिल्लक राहिला नाही.

भाजपने भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत पहिल्याच प्रभागात बिनविरोध विजय मिळवत खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, छाननीच्या दिवशीच विजय निश्चित झाल्याने पक्षाचे मनोबल अधिक वृद्धिंगत झाले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि इतर विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

स्थानिक राजकीय वातावरणात या घडामोडीमुळे चांगलीच चर्चा रंगली असून पुढील टप्प्यांतील निवडणूक लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading