Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / दिल्ली येथील घटनेनंतर भुसावळ विभागात सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट

दिल्ली येथील घटनेनंतर भुसावळ विभागात सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट

देशभरात वाढलेल्या सुरक्षा सज्जतेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवासी, रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वेची महत्त्वाची साधनसंपत्ती सुरक्षित राहावी यासाठी सर्वंकष सुरक्षा उपाययोजना अमलात आणल्या आहेत. विभागात सर्वत्र उच्चतम सतर्कतेची पातळी लागू करण्यात आली असून सर्व स्टेशन व कार्यक्षेत्रांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

सतर्कता व समन्वय –

भुसावळ विभाग स्थानिक पोलिस प्रशासन व गुप्तचर यंत्रणांशी सतत संपर्क ठेवून माहितीचे आदानप्रदान आणि जलद प्रतिसाद सुनिश्चित करत आहे. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निगराणी व निरीक्षण –

सर्व स्टेशनवरील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सतत कार्यरत ठेवून २४ तास निरीक्षण केले जात आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि वाणिज्य विभागातील कर्मचारी यांना विशेषतः सूचना देण्यात आल्या आहेत की:

  • संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू ओळखाव्यात,
  • तत्काळ संबंधित निरीक्षकांना माहिती द्यावी.
  • मुख्य स्टेशनवर कुत्र्यांचे पथक (Dog Squad) सतत सज्ज ठेवण्यात आले आहे.

प्रत्यक्ष तैनाती व गस्त वाढ –

प्लॅटफॉर्म, यार्ड, सर्क्युलेटिंग क्षेत्र तसेच महत्त्वाच्या ठिकाणी RPF, GRP आणि अँटी-सॅबोटेज पथकांची तैनाती वाढविण्यात आली आहे. संयुक्त पथकांकडून विशेषतः रात्रीच्या वेळी आणि एकाकी भागात सघन गस्त घालण्यात येत आहे. बॉम्ब शोध पथके २४x७ सज्ज ठेवली असून आकस्मिक तपासणीसाठी कार्यरत आहेत.

प्रवासी जनजागृती व प्रवेश नियंत्रण –

प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करणाऱ्या उद्घोषणा व जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्यात येत आहेत. संवेदनशील ठिकाणी प्रवेश नियंत्रण कडक करण्यात आले असून हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

वरिष्ठ स्तरावर देखरेख व आपत्कालीन तयारी

प्रमुख स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्तिगतरीत्या पाहणी केली जात आहे. कोणतीही आकस्मिक घटना घडल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आपत्कालीन पथके सदैव सज्ज आहेत. सुरक्षा नियंत्रण कक्ष सतत क्षेत्रातील पथकांशी संपर्कात राहून जलद समन्वय राखत आहेत.

प्रवाशांना आवाहन –

प्रवाशांनी सुरक्षा तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती, न ओळखलेले सामान किंवा विचित्र हालचाल दिसल्यास त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येते.

भुसावळ विभाग प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून सुरक्षित आणि निश्चिंत रेल्वे प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. प्रवाशांच्या सहकार्यानेच ही सज्जता अधिक प्रभावी ठरेल.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading