Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / रावेर लोकसभा अंतर्गत सीसीआयचे ८ कापूस खरेदी केंद्र सुरू होणार — केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे प्रयत्न फळाला

रावेर लोकसभा अंतर्गत सीसीआयचे ८ कापूस खरेदी केंद्र सुरू होणार — केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे प्रयत्न फळाला

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून, रावेर लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे केलेल्या मागणीप्रमाणे भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत रावेर लोकसभा अंतर्गत ८ कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.

ही केंद्रे रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, शेंदुर्णी (पहूर), भुसावळ, चोपडा आणि बोदवड येथे सुरू करण्यात येणार असून, याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा या ठिकाणी देखील केंद्र सुरू होणार आहेत.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एकूण १५ कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित होणार असून, शेतकऱ्यांना एफएक्यू प्रतीच्या कापसासाठी किमान हमी दराने खरेदीची सुविधा उपलब्ध होईल.

त्यापैकी काही केंद्रांच्या सुरुवातीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:

  • बोदवड – १० नोव्हेंबर २०२५
  • जामनेर – १२ नोव्हेंबर २०२५
  • भुसावळ – १३ नोव्हेंबर २०२५
  • मुक्ताईनगर – १७ नोव्हेंबर २०२५

इतर ठिकाणचे केंद्र काही दिवसांत सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

या निर्णयामुळे रावेर लोकसभा क्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी मोठी सोय उपलब्ध होणार असून, बाजारभाव घसरण्याच्या परिस्थितीतही त्यांना हमीभाव मिळणार आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe