Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / रेल्वे प्रवाशांसाठी सर्व सेवा आता एका क्लिकवर, “रेलवन (RailOne)” अ‍ॅप लाँच

रेल्वे प्रवाशांसाठी सर्व सेवा आता एका क्लिकवर, “रेलवन (RailOne)” अ‍ॅप लाँच

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक अभिनव आणि सर्वसमावेशक मोबाईल अ‍ॅप — “रेलवन (RailOne)” लाँच केले आहे. हे अ‍ॅप आता अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअर वर मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.

या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना तिकीट बुकिंग (आरक्षित, अनारक्षित, प्लॅटफॉर्म तिकीट), पीएनआर व ट्रेन चौकशी, यात्रा नियोजन, रेल मदत, ट्रेनमधील भोजन बुकिंग तसेच मालवाहतूक (फ्रेट) सेवा या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात.

विशेष वैशिष्ट्ये :

सिंगल साइन-ऑन (Single Sign-On):
रेल कनेक्ट किंवा UTS ऑन मोबाईल अ‍ॅपवरील विद्यमान यूजर आयडी वापरून थेट लॉगिन करता येते. त्यामुळे अनेक अ‍ॅप्स डाउनलोड करण्याची गरज नाही.

आर-वॉलेट (Railway e-Wallet):


जलद व सुरक्षित तिकीट बुकिंगसाठी रेल्वे ई-वॉलेटची सोय. यासोबत mPIN व बायोमेट्रिक लॉगिन चे पर्यायही उपलब्ध आहेत.

जलद नोंदणी व गेस्ट लॉगिन:
नवीन वापरकर्त्यांसाठी अत्यंत सोपी नोंदणी प्रक्रिया. चौकशीसाठी फक्त मोबाईल क्रमांक व OTP वापरून लॉगिन करता येते.

या अ‍ॅपमुळे रेल्वे प्रवास आता अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल बनला आहे. हे अ‍ॅप भारतीय रेल्वेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

रेल्वे प्रशासनाचे सर्व प्रवाशांना आवाहन

“रेलवन मोबाईल अ‍ॅप” आजच डाउनलोड करा, तिकीट बुकिंगची प्रक्रिया सुलभ करा आणि आपला प्रवास अधिक आनंददायी बनवा।

ब्युरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading