Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / चंद्रशेखर बावनकुले यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये क्रीडा साहित्य वाटप, गणेशोत्सव तयारीचा आढावा

चंद्रशेखर बावनकुले यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये क्रीडा साहित्य वाटप, गणेशोत्सव तयारीचा आढावा

खबर 24 एक्सप्रेस | नागपूर : महाराष्ट्राचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुले यांच्या उपस्थितीत नियोजन भवन, नागपूर येथे एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण मंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी आणि सर्वांगीण विकास साधता यावा हा उपक्रम राबवण्यात आला.

याच वेळी खाजगी ट्रॅव्हल्स संघटना व उमेद बचत गटांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधण्यात आला. प्रवाशांच्या अडचणी, वाहतुकीच्या सुविधा आणि व्यवस्थापन यावर चर्चा झाली. त्याचबरोबर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि तयारीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत चंद्रशेखर बावनकुले यांच्यासमवेत वित्त व नियोजन राज्यमंत्री ऍड. आशिष जैसवाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण (प्रतिभा) प्रभाकरराव दटके, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा साहित्य वितरण, वाहतूक व्यवस्थेची सुधारणा आणि गणेशोत्सवासाठी सुरक्षेच्या तयारीवर भर असल्यामुळे ही बैठक नागपूरकरांसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.


Bureau Report : Akash Dhake


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe