Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / Nagpur : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक, 2025-26 वार्षिक आराखड्याचा आढावा

Nagpur : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक, 2025-26 वार्षिक आराखड्याचा आढावा

नागपूर | भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, महाराष्ट्राचे महसूल मंत्री व नागपूर-अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister and, Nagpur Amravati Palakmantri Chandrashekhar Bawankule) यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, नागपूर येथे जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत वित्तीय वर्ष 2025–26 करिता सादर केलेल्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीदरम्यान आरोग्य विभागाला बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत 5 रुग्णवाहिका (Ambulance) व 2 ई-कचरा गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे आरोग्य सेवा तसेच पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या सर्व योजना वेळेत व पारदर्शक पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून त्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होईल.

या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री अड. आशीष जायसवाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. परिनय फुके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. आशीष देशमुख, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, आमदार संजय मेश्राम, आमदार कृपाल तूमाने, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशासनामधून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, एनएमआरडीए आयुक्त संजय मीना व पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस हजर होते.

Bureau Report : Khabar 24 Express


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading