
भुसावल शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर लोखंडी पुलाला लागून साने गुरुजी यांचे स्मारक आहे. आजच्या सद्यस्थितीत साने गुरुजी यांच्या स्मारकाची दुरावस्था झालेली आहे. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी स्टेशनवर जाण्याकरिता साने गुरुजी यांच्या स्मारकावर पाय ठेवून अवैध मार्गाने रेल्वे स्टेशनवर जातात. त्यामुळे स्मारकाची विटंबना होते तरी साने गुरुजी यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात यावे व रेल्वे स्टेशन कडे जाणारा अवैध मार्ग बंद करण्यात यावा अशी आपणांस आम्ही विनंती करत आहोत.

दुसरे असे की, लोखंडी पुलासमोर काही वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांकरिता नगर पालिकेच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत चालण्यासाठी सर्कल बनविण्यात आले होते. आज रोजी त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना उभे राहण्या करिता सोईस्कर असे ठिकाण नाही. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांसह – विद्यार्थ्यांची दिवसभरात ये-जा सुरू असते त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता सदरील ठिकाणी वाहतूक पोलिसांना उभे राहून वाहतूक नियंत्रण करण्याकरिता त्या ठिकाणी सर्कल बनवण्यात यावे अशी देखील आम्ही आपणास विनंती करतो. भुसावळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्या करिता गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली सिग्नल यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात यावी ही आपणांस विनंती आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express