Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / महसूल सप्ताहाचा उत्साही प्रारंभ, संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न

महसूल सप्ताहाचा उत्साही प्रारंभ, संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न

भुसावळ, ४ ऑगस्ट २०२५ : महसूल सप्ताह २०२५ च्या निमित्ताने भुसावळ महसूल मंडळ अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोउद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

शासन निर्णयातील तरतुदींनुसार, नागरिकांना एका छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र व विविध दाखले मंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट मंत्री महोदयांनी ऐकून घेतल्या आणि त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. याशिवाय, ७/१२ उताऱ्याच्या संगणकीकरण प्रक्रियेत झालेल्या त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना देखील मंत्री महोदयांनी दिल्या.

या शिबिरात उपस्थित मान्यवरांमध्ये उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, तलाठी मंगेश पारिसे, तेजस पाटील, बाळासाहेब गायकवाड, सोनाली कोळी, नायब तहसीलदार शोभा घुले, प्रीती लुटे, जितेंद्र पाडवी, कोतवाल रवींद्र धांडे, जितेश चौधरी, सुपडू मोरे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी आणि सामान्य नागरिक देखील उपस्थित होते.


ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Khabar 24 Express | नयी सोच, नया भारत


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading