Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / रेल्वेत बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर तपासणी पथकाची कठोर कारवाई

रेल्वेत बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर तपासणी पथकाची कठोर कारवाई

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने बिना तिकीट व अनियमित प्रवास रोखण्यासाठीच्या सततच्या प्रयत्नांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. प्रवाशांनी शिस्तबद्ध प्रवास करावा व रेल्वेच्या उत्पन्नाचे संरक्षण व्हावे यासाठी वचनबद्ध असलेल्या वाणिज्य विभागाने विभागातील तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.


विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या सुचनेनुसार आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) श्री. पी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. विभागातील विविध गाड्यांमध्ये सातत्याने व व्यापक तपासणी मोहीम राबवून, बिना तिकीट प्रवास, अनियमित तिकीट आणि प्रवास नियमांचे इतर उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. या मोहीमेमुळे विभागाचे उत्पन्न वाढले असून, प्रवाशांमध्ये कायदेशीर व जबाबदारीने प्रवास करण्याची शिस्त निर्माण झाली आहे.

वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये (1 एप्रिल ते 30 जून 2025) भुसावळ विभागाने एकूण ₹29.19 कोटी रुपयांचे तिकीट तपासणीद्वारे महसूल मिळवला असून एकूण 3,25,000 प्रकरणांमध्ये बिनातिकीट व अनियमित प्रवास आढळून आले.

तपशील पुढीलप्रमाणे:

▪ विनातिकीट प्रकरणांमधून एकूण 1,86,950 प्रकरणे त्यातून ₹20.45 कोटीचा दंड वसूल.
▪ अनियमित प्रवासाची एकूण 1,38,500 प्रकरणे नोंदवली आहेत त्यातून ₹8.72 कोटीचा दंड वसूल.
▪ सामानाच्या बुक न केलेल्या एकूण 370 प्रकरणांमधून ₹1.08 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

.

.

.

Chandrashekhar Bawankule सादगी और सेवा का नाम


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

Ghaziabad से Bangladesh तक मौत का कारोबार Medical Store वाला Saurabh Tyagi कैसे बना कफ सिरप का किंग?

Ghaziabad से Bangladesh तक मौत का कारोबार Medical Store वाला Saurabh Tyagi कैसे बना कफ सिरप का किंग?

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading